पोस्ट्स

पाऊस

पाऊस मानसून एकदाचा दाखल झाला .दरवर्षी शेतकरी असो की नोकरदार पावसाची अतुरतेने वाट बघत असतो .पाऊस मात्र जेंव्हा त्याची इच्छा होईल तेंव्हाच पड़त असतो .पावसाळ्याला सुरुवात झाली की पाऊस येतो अशी कल्पना करने म्हणजे शुद्ध मूर्ख पणा होय कारण तो कोकणात पडला म्हणजे महाराष्ट्र भर पडतो असे अजिबात नाही .रात्रि नगरला पाऊस झाला तर राहुरी ,श्रीरामपुर ला थेंब सुद्धा नसतो आणि मग सकाळी वर्तमानपत्र त्याचे ज्ञान वाढवतात की काल नगरला मुसळधार पाऊस !!! असे कमी अधिक चित्र सगळी कड़े दिसत असते मग लोक चर्चा करतात इकडे पाऊस कमी तिकडे पाऊस जास्त वगैरे वगैरे .तर मुद्दा काय आहे की पाऊस पडण्याचे प्रमाण असमान  का ? उत्तर सर्वांना माहित आहेच पण उत्तर माहित असूनही आपण त्यामुळे होणाऱ्या परिणाम व दुष्परिणाम याचा अभ्यास करीत बसतो ,उपाय योजना करीत च नाही . मला असे वाटते की आपण आता वृक्षारोपण केले पाहिजे आणि झाड़े लावून ती वाढविली पाहिजे मग पाऊस यत्र तत्र सर्वत्र सारखा पडेल आणि आपला देश सुजलाम सुफलाम होईल.